राष्ट्रभाषा संपर्काचेउत्तम माध्यम

By Admin | Updated: October 4, 2015 23:32 IST2015-10-04T23:31:22+5:302015-10-04T23:32:26+5:30

दिंडोरी : कावळे विद्यालयात चर्चेतील सूर

The best medium of communication is the national language | राष्ट्रभाषा संपर्काचेउत्तम माध्यम

राष्ट्रभाषा संपर्काचेउत्तम माध्यम

दिंडोरी : प्रत्येक प्रांताची एक बोलीभाषा असते. बोली हे आपापसातील भावभावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत येथील कावळे विद्यालयात झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले.कादवा साखर कारखाना कार्यस्थळावरील बी. के. कावळे माध्यमिक विद्यालयात हिंदी सप्ताहानिमित्त मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेतला. प्रांतापलीकडे जाताना बोलीभाषेला मर्यादा येतात. तेव्हा राष्ट्रभाषा ही संपर्क माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते, असे विचार वरखेडा येथील सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सुबोध प्रधान यांनी यावेळी व्यक्त केले.
कितीही यंत्रे शोधली तरी ती कधी बोलत नाहीत. शेवटी माणसांची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही काही वक्त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रितेश पवार, आकांक्षा महाले, विलास शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. हिंदी भाषेची महती स्पष्ट केली. हिंदी सप्ताहात विद्यालयात काव्यवाचन, हस्ताक्षर, निबंध लेखन आदि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन ऋतुजा सोनवणे हिने केले. आभार विठ्ठल संधान यांनी केले. मुख्याध्यापक लक्ष्मण महाडिक यांनी सुबोध प्रधान, कृषी अधिकारी नरेंद्र राऊत यांचे स्वागत करून सत्कार केला़ (वार्ताहर)

Web Title: The best medium of communication is the national language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.