बडगुजरांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

By Admin | Updated: April 10, 2016 23:51 IST2016-04-10T22:54:32+5:302016-04-10T23:51:55+5:30

बडगुजरांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Benghujar's bail hearing on Monday | बडगुजरांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

बडगुजरांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

नाशिक : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या कथित वक्तव्याप्रकरणी भाजपा महिला आघाडी मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि़ ११) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे़ मुंबई नाका पोलिसांनी बडगुजर यांना मंगळवारी (दि़ ५) अटक केली होती़
भाजपा महिला मेळाव्यातील राड्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले़, तर भाजपा नेत्यांनीही बडगुजर यांच्या अटकेसाठी दबाव आणल्याने मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी (दि़ ५) सिडकोतील संपर्क कार्यालयातून अटक केली़ बडगुजर यांना बुधवारी (दि़ ६) कनिष्ठ न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी (दि़ ७) जामिनावर युक्तिवाद होऊन जामीन फेटाळण्यात आला़ दरम्यान, जिल्हा व सत्र न्यायालयात बडगुजर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि़ ११) सुनावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Benghujar's bail hearing on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.