चोवीस हजारांपैकी साडेचार हजार रिक्षाचालकांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:47+5:302021-06-05T04:11:47+5:30
कोरोनामुळे शासनाने अर्थसहाय्य योजनेंतर्गत परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये अनुदान जाहीर केले. त्यानुसार परवानाधारक रिक्षामालकांना त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने ...

चोवीस हजारांपैकी साडेचार हजार रिक्षाचालकांना लाभ
कोरोनामुळे शासनाने अर्थसहाय्य योजनेंतर्गत परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये अनुदान जाहीर केले. त्यानुसार परवानाधारक रिक्षामालकांना त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध केली होती. नाशिक कार्यक्षेत्रात येणाऱ्या नाशिक, मालेगाव, अहमदनगर व श्रीरामपूर अशा ३७ हजार ६३६ परवानाधारकांपैकी ६ हजार ४४ रिक्षामालकांनी योजनेचा लाभ घेतला. उर्वरित रिक्षामालकांनी लवकर ऑनलाईन अर्ज करावेत, तसेच रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा सभासदांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.
इन्फो===
विभागातून ७,९०४ अर्ज
प्रादेशिक परिवहन विभाग नाशिकमध्ये २४,१४३ परवानाधारक आहे. त्यापैकी ४,७८२ अर्ज प्राप्त झाले असून, ४,४८४ अर्ज मंजूर झाले. मालेगाव ५,०३७ पैकी ७२९ अर्ज आले, त्यातील ३८५ अर्ज मंजूर झाले. अहमदनगरमधील ५,७२०पैकी १,५४७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ७४७ अर्ज मंजूर झाले आहे. श्रीरामपूर २,७३६पैकी ८४६ अर्ज प्राप्त झाले, तर ४२८ अर्ज मंजूर झाले. परवानाधारकांपैकी ७,९०४ जणांनी अर्ज केले, त्यातील ६,०४४ अर्ज मंजूर झाले.