लक्ष्मीनगरच्या सरपंचपदी बेंडकोळी
By Admin | Updated: September 2, 2016 22:28 IST2016-09-02T22:28:12+5:302016-09-02T22:28:38+5:30
लक्ष्मीनगरच्या सरपंचपदी बेंडकोळी

लक्ष्मीनगरच्या सरपंचपदी बेंडकोळी
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील एकजुटीसाठी प्रसिद्ध असलेल्या अन् भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी भेट दिलेल्या लक्ष्मीनगरच्या सरपंचपदी जयश्री सुदाम बेंडकोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकीचे कामकाज मंडल अधिकारी बी. एन. बाहीकर यांनी पाहिले. या ग्रामपंचायत निवडणुकीचे मार्गदर्शन नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दादाभाऊ शिरसाठ यांनी केले.
यावेळी उपसरपंच विजय दराने, भास्कर जोशी, सुरेखा भांगरे, गणेश करवर, सुनीता खोकले, नामदेव खोकले, नेमाणे, ग्रामसेवक ठाकरे, सुरेश दराने, राजाराम पासलकर, बाळासाहेब भांगरे, दशरथ बेंडकोळी, धोंडीराम जोशी, विष्णू कारोटे,
काळू शेने, पंढरीनाथ चिरके, पांडुरंग कारोटे आदि उपस्थित होते. बिनविरोध निवडीची घोषणा होताच ग्रामस्थांनी विजयोत्सव साजरा केला. (वार्ताहर)