मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:32 IST2020-08-29T16:30:57+5:302020-08-29T16:32:20+5:30
सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे सुरू करावेत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनाच्यावतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद
सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे सुरू करावेत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनाच्यावतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जागे करण्यासाठी सकाळी अकरा वाजता सप्तशृंगगडावर पहिल्या पायरीजवळ खासदार डॉ.भारती पवार, भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर ,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार,तालुका अध्यक्ष दिपक खैरनार,सूधाकर पगार यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी कळवण तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपतालुका अध्यक्ष विनायक दुबे,सप्तशृंगगड शहर अध्यक्ष प्रकाश कडवे, गडावरील व्यवसायिक,ग्रामस्थ,पुरोहित संघ,डोलिवाले बांधव आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (२९सप्तश्रृंगगड)
-----------------------व्यावसायिकांची उपासमार----------
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक तिर्थक्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दशर्नासाठी येणार्या भाविकांना १८ मार्च पासूनच भाविकांना ब्रेक लागला व चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून श्री क्षेत्र सप्तशृंगगड, शिर्डी, त्र्यंबकेश्वर,अन्य ईतर धार्मिक स्थळे लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद असल्याने येथील व्यवसायिकांवर गाव सोडण्याची व उपासमारीची वेळ आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिरावर येथील अर्थचक्र अवलंबून आहे. मागील महिन्यात येथील व्यावसायिकांनी सप्तशृंगी मंदिर खुले करा अन्यथा गाव दत्तक घ्या अशी मागणी देवी संस्थानकडे निवेदना द्वारे केली होती.
ईतर राज्यातील मंदिर सुरू झालीत, एकीकडे मॉल चालू झालेत मग आमच्या महाराष्ट्रातील मंदिरे बंद का ? मंदिर सुरू करावी मुख्यमंत्र्यानी यावर त्वरीत निर्णय घ्या.
-भारती पवार, खासदार