येवलेकरांच्या आनंदावर विरजण

By Admin | Updated: September 12, 2016 01:05 IST2016-09-12T01:04:59+5:302016-09-12T01:05:14+5:30

चाचणी अर्धवट : धरणातील साठा कमी झाल्याचे सांगत पुणेगावचे पाणी केले बंद

Bejoyed at the joy of the children | येवलेकरांच्या आनंदावर विरजण

येवलेकरांच्या आनंदावर विरजण

 पाटोदा : हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन येवला तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्यास तालुक्यातील बाळापूरपर्यंत चाचणीसाठी २६ आॅगस्टपासून पुणेगाव धरण समूहातून सोडण्यात आलेले पाणी संबंधित विभागाने (दि. १० आॅगस्ट) रात्री उशिरा धरण समूहात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देत बंद केल्याने येवलेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
चाळीस वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असण्याऱ्या या कालव्याच्या चाचणीसाठी पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊन पाणी चाचणी नक्की यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र आता पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या असून, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
येवला व चांदवड तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या या कालव्याच्या निर्मितीस तत्कालीन आमदार कै. जनार्धन पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून रोजगार हमी योजनेतून प्रारंभ केला होता; मात्र तद्नंतर निधी व सरकार बदलामुळे या कालव्याचे काम प्रलंबित होते. कालव्याचे राजकारण करीत अनेक निवडणुका यशस्वी झाल्या मात्र काम रेंगाळलेलेच होते.
दरम्यानच्या काळात २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातून निवडणूक लढविली त्यावेळी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव कालव्याचे काम पूर्ण करून येवला तालुक्यात हरित
क्रांती करू असे आश्वासन दिले होते.
किरकोळ अपवाद वगळता कालव्याचे येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत काम पूर्ण झाले आहे. यावर्षी धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरल्याने ओव्होरफ्लो च्या पाण्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत पाणी चाचणी घ्यावी अशी मागणी येवला तालुका राष्ट्रवादी कॉंगेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार व लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी २३ आॅगस्ट पासून कातरणी येथे कालव्यावरच आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेवून २६ आॅगस्ट पासून कालव्यास चाचणीसाठी पाणी सोडण्यात आले होते. तब्बल ११ दिवस अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी ५ सप्टेंबर रोजी परसूल येथून दरसवाडी धरणात प्रवाहित झाल्याने येवलेकारांच्या पाणी चाचणीच्या अशा पल्लवित झाल्या होत्या.
पाणी दरसवाडी धरणात सोडून साठा करून हे पाणी बाळापुर पर्यंत चाचणीसाठी सोडले जाणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकरी दरसवाडी धरण परिसरात पाहणी करून पाणी चाचणी साठी नक्की सुटेल व बाळापुर पर्यंत चाचणी पूर्ण होईल अशी अशा बाळगून होते. मात्र शनिवारी उशिरा संबधित विभागाने पावसाने उघडीप दिल्याने धरण समुहातील पाणी साठा कमी झाल्याचे कारण पुढे करीत पाणी बंद के ले. यामुळे येवेलेकरांणा पुन्हा पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचा ५० ते ६३ किलोमीटर दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ५० ते ६३ किलोमीटर दरम्यान कालव्यात सिमेंट कॉंक्र ीटचे अस्तरीकरण कण्यात यावे. त्यामुळे पाणी गळती कमी होईल.
पुणेगाव ते दरसवाडी दरम्यान मोठया प्रमाणात पाणी चोरी व गळती झाल्याने पाण्याचा प्रवाह कमी झाला व पाणी पोहोचण्यास उशीर झाल्यानेच बाळापुर पर्यंत चाचणी होऊ शकली नाहीअसे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
दरसवाडी धरणाची क्षमता १०८ द.ल. घनफुट इतकी आहे. मात्र धरणात आज अखेरपर्यंत फक्त ८० द.ल. घनफुट इतकेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत चाचणी होणे शक्यच नाही. पुणेगावच्या पाण्याने दरसवाडी धरण न भरता पाणी सरळ येवला तालुक्यातील डोंगरगाव कालव्या कडे वळविण्यात यावे यासाठी आमदार छगन भुजबळ यांनी या कामासाठीसुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे मात्र त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्याने हे काम प्रलंबित आहे. शासनाने या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देवून सदरचे काम तत्काळ सुरु करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bejoyed at the joy of the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.