लेखा कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे
By Admin | Updated: October 9, 2015 23:54 IST2015-10-09T23:54:15+5:302015-10-09T23:54:41+5:30
लेखा कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे

लेखा कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे
नाशिक : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने येत्या १५ आॅक्टोबरपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजनेचे पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ५ ते ८ आॅक्टोबर २०१५ दरम्यान चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक होऊन त्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील पदांसंदर्भात विषय येत्या तीन महिन्यांत मार्गी लावण्याबाबत प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी आश्वासन दिले. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. संघटनेचे महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे संघटनेने १५ आॅक्टोबरपासून पुकारलेले मनरेगा व इंदिरा आवास योजनेचे कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीसाठी कर्मचारी संघटनेचे विजयसिंह सूर्यवंशी, पांगूळ निवारे, चंद्रशेखर फसाळे, श्रीपाद जोशी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)