जायखेड्यात व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:46 IST2019-02-16T17:46:19+5:302019-02-16T17:46:33+5:30

जायखेडा : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तिसर्या दिवशीही सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.

Behind the deal in the shop | जायखेड्यात व्यवहार बंद

जायखेड्यात व्यवहार बंद

जायखेडा : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तिसर्या दिवशीही सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.
जायखेडा येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गावातील व मुख्य बाजार पेठेतील आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली. यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट होता. घडल्या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र आक्र ोश दिसून आला.
कालच गावातील तरु णांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत दहशतवादी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला होता. काश्मीरात लष्कराच्या जवानांवर झालेला आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याने सर्वस्थरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Behind the deal in the shop