एरंडगाव : कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने येथे मुंडन आंदोलन करून सरकारचे श्राध्द घालण्यात आले. केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे शिफारसी वरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. शासनाने निर्यात बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास या पुढे कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन उग्र करण्यात येईल. तसेच राज्यमंत्री बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली लवकरच गनिमी काव्याने दिल्लीत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी दिला. आंदोलन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, शंकर गायके, वसंत झांबरे, पांडुरंग शेलार, जगदीश गायकवाड, रामभाऊ नाईकवाडे, गणेश लोहकरे, सचिन पवार, शिवाजी निकम, भागवत भड, सागर गायकवाड, कलीम पटेल, गोरख निर्मळ, संजय मेंगाने, माहेबूब शेख, दत्तू बोरणारे, बाळू बोराडे, संतोष रंधे, निवृत्ती मढवई, वाल्मिक घोरपडे, शिवाजी खापरे, बाळासाहेब गुंजाळ, रशीद पटेल, सुदाम पडवळ, अशोक खापरे, दत्तू घोरपडे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते (१७ येवला १)
येवल्यात प्रहारतर्फे मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:25 IST
एरंडगाव : कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने येथे मुंडन आंदोलन करून सरकारचे श्राध्द घालण्यात आले. केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे शिफारसी वरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला.
येवल्यात प्रहारतर्फे मुंडन आंदोलन
ठळक मुद्देनिर्यात बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास या पुढे कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन उग्र