युगांतरच्या वतीने ‘संगीत रजनी

By Admin | Updated: April 16, 2016 23:28 IST2016-04-16T23:15:15+5:302016-04-16T23:28:07+5:30

युगांतरच्या वतीने ‘संगीत रजनी

On the behalf of the mutual 'Music Rajni | युगांतरच्या वतीने ‘संगीत रजनी

युगांतरच्या वतीने ‘संगीत रजनी

’नाशिक : उपनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त युगांतर सोशल फाउंडेशनच्या वतीने युगांतर जल्लोष जयंतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांची संगीत रजनी कार्यक्रमांतर्गत अनेक भीम गीते तसेच चित्रपट गीते आदर्श शिंदे यांनी सादर केले. सोनियाची उगवली सकाळ, देवा तुझ््या गाभार्याला, भीमा कोरेगाव, अंगठी सोन्याची बोटाला, जगात झाली भीम जयंती हायफाय आदि गीतांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. यावेळी माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे, नगरसेवक हरिश भडांगे, नगरसेवक राहुल दिवे, संजय भालेराव, विलासराज गायकवाड, गणेश कदम, विक्रम कदम, कपिल शर्मा, शरद साळवे, सुनील जाधव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रस्ताविक युगांतरचे अध्यक्ष रवि पगारे यांनी, तर अभारप्रदर्शन सौ. सुषमा पगारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशांत भालेराव, नितीन जाधव, सागर भालेराव, किरण घोडेराव, प्रदीप देशपांडे, हेमंत बांगर, अभिजीत जोपूलकर, अनिरु द्ध घोडेराव, नितीश घोडेराव, बापूसिंघ पाटील, प्रदीप पवार, नितीन गायकवाड, योगेश फुलसुंदर आदि प्रयत्नशील होते. (प्रतिनिधी)

Web Title: On the behalf of the mutual 'Music Rajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.