नाशिक : महिला दिनाचे औचित्य साधत आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करीत महिला कार्यकर्त्यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाच्या मागणीकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. महापालिकेने शहरातील हॉटेल्सचालकांना त्यांच्याकडील स्वच्छतागृह महिलांसाठी खुले करून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, काही हॉटेल्सचालकांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. शहरात महिला स्वच्छतागृहांबाबत नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्णय घ्यावा, यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आपचे जितेंद्र भावे, स्वप्नील घिया यांचेसह महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.
‘आप’च्या वतीने मनपासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:52 IST