शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भूगर्भ हालचालींच्या अभ्यासास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:23 IST

नाशिक : कळवण व पेठच्या सीमा भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील भूगर्भ विभागाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल ...

नाशिक : कळवण व पेठच्या सीमा भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील भूगर्भ विभागाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी दळवट परिसरातील भूगर्भ हलाचालींचा अभ्यास सुरू केला आहे. हे पथक पुढील दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात परिसरातील भूगर्भातील हालचाली व भूकंपनाची कारण मीमांसा करण्यात येणार आहे. तसेच भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळण्याठी उपाययोजनेविषयी विशेष कृतिबंध तयार करण्यात येणार आहे.दळवट, जयदर या पेठ तालुक्यांतील गावांबरोबरच कळवण तालुक्यांतील ओतूर, कुंडाणे आदी गावांना गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसतात.  त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्णाच्या सीमालगतच्या भागांतही अशाचप्रकारच्या सौम्य भूकं पाचे धक्के बसल्याची नोंद झालेली आहे. या धक्क्यांची तीव्रता तीन रिस्टल स्केल आणि त्यापेक्षाही कमी नोंदवली गेली असली तरी भविष्यात याचे भीषण परिणाम समोर येऊ नये यासाठी या भागात भूगर्भ शास्त्रज्ञांचे पथक काम करणार आहे. या भागात भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी आटणे, घरांना तडे जाण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत असतानाच नाशिक शहरालाही गेल्या वर्षभरात भूकंपाचे हलके धक्के बसले होते. त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर दर्शविण्यात आला होता. त्यामुळे नाशिकपासून जवळ असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील भूगर्भात गंभीर हालचाली होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्य व केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्याची दखल घेत भूगर्भ शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, या विषयाचा सविस्तर अभ्यास सुरू केला आहे. हे पथक पुढील दोन वर्षे नियमित अभ्यास व सर्वेक्षण करून याविषयीचा शासनाला अहवाल सोपविणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक