पांडाणे : दिंडोरी तालुक्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर भातशेतीला कापणी व मळणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी जेवढा भाताची सोंगणी ( कापणी ) करतो तेवढेच उत्पादन पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम व उत्तर पटयात भात शेती मोठया प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी सतत दोन महिने संततधार पावसामुळे भात पिकासाठी पोषक वातावरण होत, परंतु दिवाळीपर्यत पाऊस असल्यामुळे कमी पावसात येणारे भात पिक तयार झाले होते. ते दिवाळीपुर्वीच सोंगणी करायला पाहिजे होती. परंतु संततधार पावसामुळे भातशेती वाया गेली. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे वाया गेला. दिंडोरी तालुक्यात द्राक्ष , टमाटा , भात , सोयाबिन पिके हे नगदी पिक समजले जाते. यावर्षी द्राक्ष व टमाटा , सोयाबिन पिक पावसामुळे वाया गेले. आता इंद्रायणी , सोनम , कोळपी अशी भात काढणीला वेग आला आहे . या भातालाही जास्त पाऊस झाल्यामुळे भात काळा पडला असून भात काढल्यानंतर चूर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत .
भात शेतीच्या कापणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:30 IST