टमाट्याखाली दडवले गोमांस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:45+5:302021-09-06T04:17:45+5:30

सिन्नर-घोटी महामार्गावर पिंपळगाव मोरनजीक सिन्नरहून घोटीकडे भरधाव वेगाने गोमांस व टोमॅटोची वाहतूक करत असताना पिकअप (क्रमांक ...

Beef hidden under tomatoes | टमाट्याखाली दडवले गोमांस

टमाट्याखाली दडवले गोमांस

सिन्नर-घोटी महामार्गावर पिंपळगाव मोरनजीक सिन्नरहून घोटीकडे भरधाव वेगाने गोमांस व टोमॅटोची वाहतूक करत असताना पिकअप (क्रमांक एम.एच.१४, जी.डी. ४८५२) गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या गाडीमध्ये वरच्या बाजूस टोमॅटो तर खालच्या बाजूला गोमांस असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर माजी सरपंच धनराज बेंडकोळी यांनी पोलीस पाटील लक्ष्मण काळे यांच्यामार्फत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. सदर पिकअप गाडीमध्ये भाजीपाला वाहन भासविण्यासाठी टोमॅटो भरलेले होते. पाठीमागे व वरील बाजूस टोमॅटो भरलेल्या जाळ्या होत्या. तसेच मध्ये प्लायवुडच्या साहाय्याने बंदिस्त केले होते. विशेष म्हणजे या गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक (एम.एच. १४ जी.डी. ४८५२) असून गाडीच्या केबिनमध्ये (एम.एच. १४ एच.यू. ६६३२) या आणखी एका नंबरची अतिरिक्त नंबर प्लेट सापडली आहे. अतिरिक्त संशयास्पद नंबर प्लेट सापडल्याने वाहन क्रमांक बदलवून या महामार्गावरून दैनंदिन वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

इन्फो

कठोर कारवाईची मागणी

नाशिक-मुंबई महामार्गावर यापूर्वीही अशीच घटना उघडकीस आली होती. एका टेम्पोचा अपघात झाल्यानंतर त्यात छुप्या रितीने गोमांसची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. सदर मार्गावरून वारंवार छुप्या पद्धतीने गोमांसाची वाहतूक होत असते. पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाही वाहतूकदारांकडून बिनधास्त वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत आहे.

फोटो- ०५ घोटी ॲक्सिडेंट १

घोटी सिन्नर महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी पिकअप उलटल्याने पिकअप गाडीची झालेली अवस्था.

050921\05nsk_16_05092021_13.jpg

फोटो- ०५ घोटी ॲक्सीडेंट१

Web Title: Beef hidden under tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.