रामकुंडावर बीडचे चोरटे

By Admin | Updated: October 14, 2015 23:06 IST2015-10-14T22:59:58+5:302015-10-14T23:06:52+5:30

सिंहस्थात केला हात साफ : चोरीच्या घटनांची नांदेड पोलिसांनी केली उकल

Beed's thieves on Ramkunda | रामकुंडावर बीडचे चोरटे

रामकुंडावर बीडचे चोरटे

नाशिक : सिंहस्थ पर्वणी कालावधीत रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेण्याच्या ३३ घटनांमध्ये सुमारे पन्नास लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे गुन्हे पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते़ यातील एका मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील बीडमधील आठ संशयितांना नांदेड पोलिसांनी पकडले असून अधिक चौकशीसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ न्यायालयाने या संशयितांना १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

Web Title: Beed's thieves on Ramkunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.