खामखेड्यात भाविकांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:58 AM2020-03-14T11:58:23+5:302020-03-14T11:58:34+5:30

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वीरांच्या कार्यक्र मात आग्यामोहोळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पंधरा ते वीस जण जखमी झाले.

 Bee attack on devotees in Khamkhed | खामखेड्यात भाविकांवर मधमाशांचा हल्ला

खामखेड्यात भाविकांवर मधमाशांचा हल्ला

Next

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वीरांच्या कार्यक्र मात आग्यामोहोळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पंधरा ते वीस जण जखमी झाले. त्यांच्यावर खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर यापैकी एकाला कळवण उपजिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.
खामखेडा येथील डोंगर पायथ्याजवळ बुटेचे रानात पुरातन शिवकालीन बुटीची विहीर असून या बुटीच्या विहिरीजवळच खामखेडा येथील सोनवणे कुटुंबीयांचा वीरांचा दैवत आहे. हे दैवत सोनवणे कुटूंबाला नवसाला म्हणून याठिकाणी नेहमी सोनवणे कुटूंबाचे कार्यक्र म सुरू होता. नवस फेडण्याच्या कार्यक्र मातील गर्दीमुळे तसेच संबळ वाद्याच्या आवाजामुळे झाडांच्या फांदीला असलेले आग्यामोहोळ चवताळून उठले व तेथील लोकांवर अचानक हल्ला केला. अचानकच मधमाशा चावू लागल्याने एकच धावपळ उडाली. या कार्यक्र माला जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक उपस्थित होते त्यापैकी १५ ते २० जणांना जास्त प्रमाणात मधमाशा चावल्याने त्यांना उपचारासाठी खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पगार यांनी जखमींवर तत्काळ उपचार केले. जखमींची प्रकृती बरी झाल्याने त्यांना औषधोपचार देऊन घरी सोडून देण्यात आले तर यापैकी एकाला मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्याला कळवण उपजिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.

Web Title:  Bee attack on devotees in Khamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक