शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीसाठी बी.एड. वेतनश्रेणी बंधनकारक नाही ; माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:58 IST

राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड.असूनही डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आता बी.एड. झाल्याच्या दिनांकापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळणार आहे. या शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन असणार नाही. संबंधित शिक्षक एच.एस.सी./बी.ए.डी.एड. वेतनश्रेणीत कार्यरत असला आणि तो ज्या दिवशी प्रशिक्षित पदवीधर अर्हता (बी.ए.बी.एड.) धारण करेल त्या दिवशी तो ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळवून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून यानिर्णयाला अनुसरून शलेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर केला आहे

ठळक मुद्देबी.एड.असून डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत शिक्षकांना ‘क’ संवर्गात स्थान मिळणार उच्च न्यायालायाच्या निकालानंतकर शिक्षण विभागाचा शासन निर्णय माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीतील अडसर दूर

नाशिक : राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड.असूनही डी.एड.वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आता बी.एड. झाल्याच्या दिनांकापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळणार आहे. या शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन असणार नाही. संबंधित शिक्षक एच.एस.सी./बी.ए.डी.एड. वेतनश्रेणीत कार्यरत असला आणि तो ज्या दिवशी प्रशिक्षित पदवीधर अर्हता (बी.ए.बी.एड.) धारण करेल त्या दिवशी तो ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळवून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून यानिर्णयाला अनुसरून शलेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर केला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा अडसर दूर होऊन सेवाज्येष्ठतेचा तिढाही अखेर सुटला आहे.राज्यातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसंदर्भात १४ नोव्हेंबर २०१७ व  २५ जानेवारी २०१७ चे परिपत्रक अधिक्रमित करण्यात आले असून शालेय शिक्षण विभागाने ३ मे २०१९ च्या शासन निर्णयात सेवा ज्येष्ठतेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाचे पदवीधर सेवाज्येष्ठतेचे १४ नोव्हेंबर २०१७ चे परिपत्रक माध्यमिक विभागासाठी लागू नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालानुसार आणि सुधारीत शासन निर्णयानुसार प्रथम बी.ए.बी एड (प्रशिक्षित पदवीधर) अर्हता प्राप्त असलेला शिक्षकच मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदास पात्र असणार आहे. तसेच पदोन्नतीसाठी वेतनश्रेणी हे बंधन असणार नाही. संबंधित शिक्षक एच.एस.सी./बी.ए.डी.एड. वेतनश्रेणीत कार्यरत असला आणि तो ज्या दिवशी प्रशिक्षित पदवीधर अर्हता (बी.ए.बी.एड.) धारण करेल त्या दिवशी तो ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळवून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहे. मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदासाठी सेवाजेष्ठता ही संबंधित शिक्षकाने बी.ए.बी.एड अर्हता पदवी पूर्ण केलेल्या दिनांकाच्या जेष्ठतेवरून ठरवावी असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील शिक्षक किशोर गोपाळ जगताप यांनी केलेल्या याचिकेसंदर्भात होता.त्यामुळे नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यात सेवाज्येष्ठतेच्या स्पष्टीकरणाअभावी खोळंबलेले व पदोन्नतीपासून वंचित राहीलेल्या पात्र शिक्षकांचा मार्ग सुकर झाल्याचे मत अ‍ॅड. प्रणिता हिंगमीरे यांनी दिली आहे. 

संस्थांनी डावललेले शिक्षक पात्र महाराष्ट्रातील काही शैक्षणिक संस्थांनी सेवाजेष्ठतेचा हक्क डावलून पदोन्नती दिल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच बी.एड. रिक्त पदावर सध्या संस्थेत डी.एड.वेतनश्रेणीवर कार्यरत असलेल्या आणि बी.एड. अर्हता प्राप्त करणाºया शिक्षकास संधी देण्या ऐवजी नव्याने बी.एड.शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या होत्या. त्यामुळे डी.एड.वेतनश्रेणीत असलेले परंतु बी.एड.अर्हताधारक शिक्षक ‘क’ संवर्ग यादीत स्थान न मिळाल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीपासून वंचित राहीलेले होते. असे शिक्षक बी.एड. अर्हता प्राप्त केलेल्या दिनांकास ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळून पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत. 

प्रशिक्षित पदवीधर अर्हतेचा दिनांक महत्वाचा माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी संस्थेने डी.एड.शिक्षकास बी.एड.वेतनश्रेणीचा लाभ दिला तो दिनांक महत्वाचा नसून ज्या दिवशी प्रशिक्षित पदवीधर अर्हता प्राप्त केली तो दिनांक महत्वाचा ठरणार आहे. संस्थेने एखाद्या शिक्षकाला तो प्रशिक्षित पदवीधर असूनही उशीरा 'क' संवर्गात स्थान दिले तरी तो शिक्षक प्रशिक्षित पदवीधर अर्हता प्राप्त करेल त्याच दिवसापासून ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान प्राप्त करणार असल्याची माहीती याचिकाकर्त्याच्या वकीलांनी  दिली आहे. 

अंमलबजावणीची मागणी न्यायालयाने निर्णयासोबत शिक्षण विभागाच्या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. आता शैक्षणिक संस्थांनी नायालायाच्या निर्णयाचा मान राखून आणि सुधारीत शासन निर्णयानुसार सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करावी आणि मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीने नेमणूका करून या निर्णयाची अंबलबजावणी करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून व शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा