बहारदार नृत्य स्पर्धा रंगली

By Admin | Updated: February 17, 2016 23:19 IST2016-02-17T23:17:23+5:302016-02-17T23:19:03+5:30

सिन्नर : अभिनेत्री तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण

Beautiful dance competition is played | बहारदार नृत्य स्पर्धा रंगली

बहारदार नृत्य स्पर्धा रंगली

सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने आयोजित लायन्स फेस्टिव्हलचा समारोप बहादार नृत्य स्पर्धेने झाला. पाच दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलला सुमारे एक लाख नागरिकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिन्नर फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लायन्स क्लबने या फेस्टिव्हलदरम्यान बिझिनेस एक्स्पोसह सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. बिझिनेस एक्स्पोमध्ये सुमारे १५० स्टॉल उभारण्यात आले होते. या स्पर्धेला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक अभिनेत्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी फेस्टिव्हलला भेट देऊन समाधान व्यक्त केले. वैयक्तिक व समूहनृत्य स्पर्धेने फेस्टिव्हलचा समारोप झाला. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
१२ ते १६ वयोगटातील हर्षाली भामरे, अमिषा देशमुख, अश्विनी रंधे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून बाजी मारली. १७ वर्षांवरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रियंका कांबळे, विशाल जाधव व धनश्री राजोळे अव्वल ठरले. १२ ते १६ वयोगटातील दुहेरी गटातून वैशाली मुरुडकर-काजल गांजवे, शुभांगी बोडके-कांचन बोडके, आसावरी भगत-धनश्री भगत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १२ ते १६ वयोगटातील समूहनृत्य स्पर्धेत नायगाव जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली. या गटात टेन जेन्स ग्रुप व लोकनेते वाजे विद्यालयाचा संघ अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर राहिला. १७ वर्षांवरील समूहनृत्य स्पर्धेत जीएमडी महाविद्यालयाचा ग्रुप अव्वल ठरला. व्ही. के. ग्रुप व जल्लोष ग्रुप यांनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. विजेत्यांना अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना तेजस्वी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण राजाराम मुंगसे, जावेद शेख, शिल्पा गुजराथी, अपर्णा क्षत्रिय, संगीता कट्यारे यांनी केले. लता गुठुळे यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.
लायन्स फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रकल्पप्रमुख मदन लोणारे, जितेंद्र जगताप, हेमंत नाईक, डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, डॉ. भरत गारे, किरण कटारिया, डॉ. विष्णू अत्रे, त्र्यंबक खालकर, अरुण थोरात, संजय झगडे, महेंद्र तारगे, कांतीलाल पटेल, राजेंद्र कपोते, डॉ. प्रताप पवार, घनश्याम देशमुख यांच्यासह सभासदांनी परिश्रम
घेतले. (वार्ताहर)

Web Title: Beautiful dance competition is played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.