वाघाडीत दोन गटांत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:13 IST2021-05-01T04:13:59+5:302021-05-01T04:13:59+5:30

वाघाडीत राहणाऱ्या ललित शिंगाडे यांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंगाडे याने मानलेल्या बहिणीला वाईट का बोलता, ...

Beatings in two groups in Waghadi | वाघाडीत दोन गटांत मारहाण

वाघाडीत दोन गटांत मारहाण

वाघाडीत राहणाऱ्या ललित शिंगाडे यांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंगाडे याने मानलेल्या बहिणीला वाईट का बोलता, तिची बदनामी का करता याची विचारणा केली असता, संशयित धनंजय डंबाळे, अविनाश पितांबर चौरे, नितीन दिलीप गांगुर्डे, दीपक दिलीप गांगुर्डे अशांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून धमकी दिली. दुसऱ्या घटनेत धनंजय डंबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपींमध्ये वाद चालू असताना फिर्यादी व त्याचा मित्र वाद सोडवण्यासाठी गेले असता त्याचा राग आल्याने संशयित आरोपी नरेंद्र शंकर लाखन, योगेश हिरामण बोके, रोहित दत्ता शिंगाडे, भास्कर लक्ष्मण बोके आदींनी कुरापत काढून धारदार शस्त्राने फिर्यादी व त्याच्या मित्राच्या डोक्यात वार करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून उर्वरित फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Beatings in two groups in Waghadi