देवदर्शनास गेलेल्या दांपत्यास मारहाणं

By Admin | Updated: July 6, 2014 00:19 IST2014-07-05T22:23:25+5:302014-07-06T00:19:17+5:30

देवदर्शनास गेलेल्या दांपत्यास मारहाणं

Beating the divorced couple | देवदर्शनास गेलेल्या दांपत्यास मारहाणं

देवदर्शनास गेलेल्या दांपत्यास मारहाणं

 

द्याने : मालेगाव तालुक्यातील दुंधे- तळवाडे शिवारातील मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील दांपत्यास अज्ञात चौघांनी मारहाण करून त्यांच्याकडील दोन तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले.
विशाल केदा पगार हे पत्नी वैशालीसह चारचाकीने (एमएच ४१ ११०९) धांद्री येथे जात होते. वाटेत दुंधे डोंगराजवळील मंदिरात दर्शन घेण्यासाठी ते जात असताना त्यांना चौघा अनोळखी इसमांनी अडवून छेडछाड व दमदाटी केली. या दरम्यान मंदिरातील बाबा यांनीही सदर दांपत्यास लफडेवाले म्हणून हेटाळणी केली. पगार दांपत्याने आपण पती - पत्नी असल्याचे ओळखपत्राद्वारे पटवून सांगितले तरीही ते न मानता सदर बाबा व चौघांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. आपल्याकडील दोन तोळे सोन्याचा नेकलेस लुटून नेला. यादरम्यान फिर्यादी पगार यांनी आपले साथीदार सागर पगार व नितीन सांगळे यांना मोबाइलने फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यांनाही अज्ञात चौघांनी मारहाण केली. तसेच आपल्या कारची काच फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Beating the divorced couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.