५० हजारांच्या खंडणीसाठी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:00+5:302021-04-30T04:19:00+5:30

पंचवटी : भाजी मार्केटमध्ये भाजीपाला व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून फिर्यादीला ...

Beaten for a ransom of Rs 50,000 | ५० हजारांच्या खंडणीसाठी मारहाण

५० हजारांच्या खंडणीसाठी मारहाण

पंचवटी : भाजी मार्केटमध्ये भाजीपाला व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून फिर्यादीला बेदम मारहाण करून त्याच्या घरात घुसून आई व पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी पेठरोडवरील शनिमंदिर परिसरात राहणाऱ्या चौघांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप पगारे याने तक्रार दाखल केली आहे.

गेल्या मंगळवारी पगारे हा घरामागे मित्र सनी सोनवणेसोबत बसलेला असताना रात्री साडेनऊ वाजता संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भालेराव, गौरव सोनवणे व त्यांचे साथीदार एका चॉकलेटी रंगाच्या चारचाकीतून हातात लाकडी दंडुके घेऊन उतरले व त्यांनी पगारेला शिवीगाळ करून दंडुक्याने बेदम मारहाण करत भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला महिना ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत पगारे याच्या घरात घुसून दरवाजाला लाथा मारून पगारेच्या आईला व पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत धमकी दिली व परिसरात दहशत निर्माण केली. खंडणी मागणाऱ्या आरोपीत सराईत काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Beaten for a ransom of Rs 50,000