शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

औषधांचे बिल मागितल्याने मेडिकल चालकाकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:43 IST

लासलगाव : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील मोरे कुटुंबातील तिघे जण लासलगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, संजीवनी मेडिकल येथून घेतलेल्या औषधांच्या बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देलासलगाव : परस्परविरोधी तक्रारी दाखल

लासलगाव : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील मोरे कुटुंबातील तिघे जण लासलगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, संजीवनी मेडिकल येथून घेतलेल्या औषधांच्या बिलामध्ये तफावत आढळल्याने मेडिकलचे संचालक गणेश फड आणि मोरे यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेणे येथील मोरे यांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने लासलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, रुग्णालयासमोरील संजीवनी मेडिकलमधून घेतलेल्या औषधांचे त्यांनी बिल मागितले असता मेडिकलचे संचालक गणेश फड यांना त्याचा राग आला. बिलामध्ये एक हजार रुपयांचा फरक असल्याने रुग्णांचे नातेवाईक व गणेश फड यांच्यात वादावादी होऊन मेडिकलमधील कामगारांसह पाच जणांनी मिळून मोरे यांना मारहाण केली तर एका महिलेला धक्काबुक्की केली असल्याचे मोरे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत देवीदास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेडिकलचे संचालक गणेश फड व इतरांवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश फड यांच्या पत्नीनेही याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी लासलगाव येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयCrime Newsगुन्हेगारी