वणी : शेताच्या बांधाची लेव्हल करताना बांधालगतची जागा सोडण्यावरु न झालेल्या वादात दोघांना लाकडाने मारहाण केल्याची फिर्याद दिल्याने दोन संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादीत उल्लेख असा दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव शिवारात दिलीप दवंगे व कुटुंबियांची शेतजमिन असुन त्यांच्या जमीनीलगत शेतीच्या लेव्हलचे काम सुरु असताना लेव्हल करताना बांधाकडे थोडी जागा सोडा नाहीतर आमचा बांध पाण्याखाली धसेल असे शुभम याने असे सांगीतल.े मात्र संजय पुंजा भालेराव, समाधान संजय भालेराव यांनी या बांधालगत जागा सोडु नका असे सांगितले. यावरु न संबंध नसताना कशाला मधे पडता तुमची या ठिकाणी जमिन नाही अशी विचारणा केल्याचा राग आल्याने दवंगे व शुभम या दोघांना समाधान व संजय भालेराव यांनी लाकडाने मारहाण केल्याने हे दोघे जखमी झाले. तसेच शिवीगाळ व दमबाजी केल्याची फिर्याद चन्द्रकला दवंगे यांनी दिली असून दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाकडाने आई- मुलाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:59 IST
वणी : शेताच्या बांधाची लेव्हल करताना बांधालगतची जागा सोडण्यावरु न झालेल्या वादात दोघांना लाकडाने मारहाण केल्याची फिर्याद दिल्याने दोन संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाकडाने आई- मुलाला मारहाण
ठळक मुद्देकोकणगाव : शिवारात दोन संशयीतांवर गुन्हा