वणी : शेतजमिनीत जेसीबी व ट्रॅक्टर नेण्यासाठी झाडाच्या फांद्याची अडचण येत असल्याने फांद्याचा अडसर दूर करण्याच्या मुद्यावरून वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले व त्यात एकाच्या डोक्याला दगडाने मारल्याने दुखापत होण्याची घटना घडली आहे.भातोडे शिवारात जयवंत उफाडे यांनी नवीन शेतजमिनीत शेततळ्याचे काम करण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टर नेण्यासाठी बाभळीच्या झाडाच्या फांद्यांची अडचण येत असल्याने जेसीबीच्या सहाय्याने या फांद्यांचा अडसर उफाडे यांनी दूर केला.यावेळी कुवर कुटुंबीयांनी सदरचे झाड आमच्या भागात असल्याने फांद्या का तोडल्या? याची विचारणा करण्यात आली व त्यातून वाद उत्पन्न झाला. रागाच्या भरात उफाडे यांना दगडाने डोक्यावर दुखापत करून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून अंबादास कुवर, नवनाथ कुवर व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडाने डोके फोडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:35 IST
वणी : शेतजमिनीत जेसीबी व ट्रॅक्टर नेण्यासाठी झाडाच्या फांद्याची अडचण येत असल्याने फांद्याचा अडसर दूर करण्याच्या मुद्यावरून वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले व त्यात एकाच्या डोक्याला दगडाने मारल्याने दुखापत होण्याची घटना घडली आहे.
दगडाने डोके फोडून मारहाण
ठळक मुद्देरागाच्या भरात उफाडे यांना दगडाने डोक्यावर दुखापत करून मारहाण