शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:00 IST

वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देफेरनिकाल जाहीर : अनेक विद्यार्थी उत्तीर्ण

नाशिक : वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले. या निकालात जवळपास निम्मेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बीकॉमच्या निकालात मर्कंटाइल लॉ (एम.लॉ) या विषयात अनेक विद्यार्थ्यांना ७ जूनला लागलेल्या निकालात अनुत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला. मात्र, त्या प्रक्रियेतही प्रचंड विलंब करण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या नंदन भास्करे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राच्या समन्वयकांना घेराव घातला होता. तसेच समन्वयकांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.दोन दिवस आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाने अखेर फेरतपासणीचा निकाल जाहीर केला यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन थांबविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अद्यापही समाधान झाले नसल्याने नाराजी कायम आहे.काठावर उत्तीर्णविषयात उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत ८० पैकी ३२ गुण मिळणे बंधनकारक आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना ३२ किंवा ३३ असेच गुणदिले आहेत. म्हणजे पुन्हा या फेरतपासणीतही अधिक पुरवण्या जोडलेले उत्तीर्ण आणि कमी पुरवण्या जोडलेले अनुत्तीर्ण असाच अंदाजे ‘निकाल’ लावण्यात आला असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे निकाला लागला असला तरी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अजूनही समाधान झालेले नसल्याने विद्यार्थ्यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीagitationआंदोलन