कोविडसोबत जगण्याची तयारी ठेवा : डॉ. नेमाडे -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:09+5:302021-07-22T04:11:09+5:30

रोटरी स्मार्ट सिटी, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडेगाव येथील संजीवनी हार्टकेअर इन्स्टिट्यूट ...

Be prepared to live with Kovid: Dr. Nemade - | कोविडसोबत जगण्याची तयारी ठेवा : डॉ. नेमाडे -

कोविडसोबत जगण्याची तयारी ठेवा : डॉ. नेमाडे -

रोटरी स्मार्ट सिटी, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडेगाव येथील संजीवनी हार्टकेअर इन्स्टिट्यूट व रिसर्च सेंटर येथे ‘कोविडकाळातील आजार आणि रुग्णसेवा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. संजीवनी हार्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ.संजय पाटील यांनी सटाणा व धोंडेगाव येथे निसर्गरम्य वातावरणात व चिलेशन थेरेपीद्वारे १०० टक्के रुग्ण कसा बरा होतो. याबाबतची सविस्तर माहिती दिली. डॉ. धनंजय अहिरे यांनी होमिओपॅथी उपचाराविषयी माहिती दिली. डॉ. मनीषा जगताप यांनीही मार्गदर्शन केले. कोविडकाळात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. विजया पाटील यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रोटरी स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष स्वाती चव्हाण यांनी केले. यावेळी डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. गायत्री गुंजाळ, डॉ. राहुल ठाकरे, डॉ. मिलिंद गांगुर्डे, डॉ. राहुल पाटील, डॉ.सुभाष पवार, डॉ. भारती पवार, डॉ.अमित धांडे, ब्रिजमोहन लोगाणी, नितीन थोरात, निशांत भावसार, दादा देशमुख, तुषार चव्हाण, अवतार सिंग, बल्ला राठी, प्रतिभा चौधरी, डी. आर. पाटील, विनोद कडले, जयंत पवार, संतोष भट आदींसह रोटरी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मृदुला जाधव यांनी केले. प्रसाद जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Be prepared to live with Kovid: Dr. Nemade -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.