शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

सावधान....! पाच रुपयांपासून दिलासा; मात्र पाचशेचा बसू शकतो भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 21:13 IST

गुरुवारपासून (दि.१) बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी निशुल्क 'कुपन' देण्यात येईल. मात्र, खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा 'जैसे-थे' असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

ठळक मुद्देएन्ट्री पॉइंटवर मोफत टोकन पोलिसांकडून दिले जाईलबाजारातून परतणाऱ्या ग्राहकांचे टोकन तपासले जाईलएक तासापेक्षा जास्त वेळ थांबल्यास पाचशे रुपये दंड

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील तोबा गर्दी होणाऱ्या बाजारपेठांमध्ये पाच रुपये आकारणी करत सशुल्क प्रवेश देण्याचा प्रयोग पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मनपाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यास दोन दिवसांपुर्वी सुरुवात केली होती. यावेळी तिकिट काऊंटरवर पाच रुपयांसह पावतीच्या देवाणघेवाणमध्ये लागणारा वेळ यामुळे ह्यसोशल डिस्टन्सह्ण धोक्यात सापडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पाच रुपये आकारणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे पाण्डेय यांनी जाहीर केले.अपुऱ्या मनुष्यबळामुळे सुरक्षित वावर राखणे, सर्व ग्राहकांना तिकिट काऊंटरवर रोखणे शक्य होत नसल्याने तुर्तास सशुल्क प्रवेशाचे निर्बंध शिथिल करण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि.१) बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी निशुल्क 'कुपन' देण्यात येईल. मात्र, खरेदीसाठी एक तासाची वेळमर्यादा 'जैसे-थे' असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही शिस्तीने पाच रुपयांची पावती घेत नाशिककरांनी बाजारपेठेत प्रवेश घेतला. पण, यावेळी बऱ्याच ह्यएन्ट्री पॉइंटह्णवर गर्दी झाली. पावती देण्यासाठी अपुरे मनुष्यबळ तसेच लागणारा वेळ यामुळे गर्दीत भर पडली. तसेच बाहेर पडणाऱ्या ग्राहकांची पावतीची तपासणी करणेही अवघड झाले. त्यामुळे अगोदर पूर्णत: मनुष्यबळ सज्ज करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पाण्डेय यांनी बुधवारी सायंकाळी मेनरोड व पवननगरच्या बाजारात पाहणी केली. यावेळी त्यांनी गुरुवारपासून सशुल्क प्रवेशाऐवजी मोफत कुपन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सशुल्क प्रवेश केवळ स्थगित केले आहेत. महापालिकेतर्फे ह्यॲपह्ण तयार झाले तसेच ई-स्वरुपात चलन फाडून प्रिंटेड तिकिट देण्याची यंत्रे उपलब्ध होताच पुन्हा पाच रुपये आकारणी सुरु केली जाणार असल्याचेही पाण्डेय यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.- -हे निर्बंध कायम- एन्ट्री पॉइंटवर मोफत टोकन पोलिसांकडून दिले जाईल- बाजारातून परतणाऱ्या ग्राहकांचे टोकन तपासले जाईल- सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल- एक तासापेक्षा जास्त वेळ थांबल्यास पाचशे रुपये दंड देखील होऊ शकतो- सुरक्षित वावर किंवा मास्क नसल्यास पाचशे रुपये दंडबाजारपेठेत थुंकताना किंवा धुम्रपान करताना आढळल्यास १ हजारांचा होईल दंडबाजारपेठेत पोलिसांची असणार पायी गस्त

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजारMarket Yardमार्केट यार्ड