शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोत्तम व्हा, समाज तुम्हाला स्विकारणारच’ : हणमंतराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:29 IST

आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देआयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहेस्वत:ची प्रगती साधण्यासाठी कधीही कोणासोबत स्पर्धा करु नकाजपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये उज्ज्वल भवितव्याची संधी

नाशिक : स्पर्धेच्या युगात चांगले, उत्तम होऊन चालणार नाही, तर आपण सर्वोत्तम होऊन यशोशिखर सर करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वोत्तम होऊन तुम्ही जेव्हा पुढे याल तेव्हा समाज तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.काठेगल्ली येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यमाच्या रंगुबाई जुन्नरे विद्यालयाला गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, मुख्याध्यापक नंदा पेठेकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने फडके यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. यावेळी गायकवाड म्हणाले, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो किंवा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? यावर आपले यश अजिबात अवलंबून नसते. आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे, हे आपण लक्षात घेत आपल्या मनाची तयारी करत आपल्यासमोर येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करायला शिकले पाहिजे. कारण संघर्ष कधी संपत नसतो आणि आव्हानेदेखील तशीच असतात फरक केवळ आव्हानांच्या स्वरुपामध्ये पडतो, असे गायकवाड यावेळी म्हणाले.भारत जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. या देशातील तरुणांना जगभरात नोकरीच्या संधी आहेत. गरज आहे ती केवळ उच्चशिक्षणासोबत कौशल्य आत्मसात करण्याची. आयुष्यात स्वत:ची प्रगती साधण्यासाठी कधीही कोणासोबत स्पर्धा किंवा तुलना करु नका. वर्गातदेखील ज्याने प्रथम क्रमांक मिळविला त्या मित्राशी आपली तुलना करायची नाही. आपण कुठे कमी पडलो त्याचा विचार करत जिद्द व क ठोर परिश्रम करावे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला. प्रास्ताविक फडके यांनी केले. सुत्रसंचालन जयश्री चौधरी यांनी केले.जपानी भाषेचे धडे देण्याचा सल्लाभविष्यात भारतातील तरुणाईला जपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये उज्ज्वल भवितव्याची संधी आहेत. गरज आहे ती केवळ जपानी भाषा शिकण्याची. जपानी भाषा ज्याला जमली त्याला जपानमध्ये कुठल्याहीप्रकारचा अडथळा येत नाही. त्यामुळे जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्याचा सल्लाही गायकवाड यांनी यावेळी संस्थेच्या विश्वस्तांना दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकSocialसामाजिकbusinessव्यवसाय