शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना स्नानासाठी बंदी

By Admin | Updated: May 7, 2014 23:31 IST2014-05-07T23:29:21+5:302014-05-07T23:31:52+5:30

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना रामकुंडात स्नानासाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त व तीनही आखाड्यांचे साधूमहंत, खालसे यांच्या बैठकीतील चर्चेत घेण्यात आला़

Bathe the devotees until the royal procession is over | शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना स्नानासाठी बंदी

शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना स्नानासाठी बंदी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक संपेपर्यंत भाविकांना रामकुंडात स्नानासाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त व तीनही आखाड्यांचे साधूमहंत, खालसे यांच्या बैठकीतील चर्चेत घेण्यात आला़
आगामी २०१४-१६ मध्ये शहरात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अुनुषंगाने साधू महंतांच्या अडचणी भाविकांची सुरक्षितता या विषयावर मंगळवारी पोलीस आयुक्तालयातील सिंहस्थ हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी हा निर्णय घेण्यात आला़
या बैठकीत पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पर्वणीच्या दिवशी भाविकांची स्नानाची गैरसोय होऊ नये, यासाठी व साधू महंतांच्या अडचणी समजावून घेऊन बाहेरून येणारे आखाडे, खालसे त्यांचे साधू महंत यांच्याशी स्थानिक स्तरावर संपर्क साधून येणार्‍या अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत करण्यात आल्याचे सांगितले़
शाही मिरवणूकीसाठी सर्वांचा सहयोग आवश्यक असून शाही मिरवणूक लवकरात लवकर काढून सकाळी १० वाजेपर्यंत संपविण्यात यावी़ गत कुंभमेळ्याला सुमारे ५० लाख भाविक आले होते यावेळी त्याहीपेक्षा जास्त संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे़
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूकीत भाविक सहभागी होणार नाहीत तसेच मिरवणूक वेळेत संपेल असे आश्वासन यावेळी साधू महंतांनी पोलीस आयुक्तांना दिले़ भाविक तसेच महंतांच्या जिवीतास धोका होऊ नये यासाठी मिरवणूकीत वाहनांची संख्या कमी ठेवण्याची खबरदारी घेण्यात येणार आहे़
या बैठकीस पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल,पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, संजीव ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे, रमेश पाटील, हेमंत सोमवंशी, बाजीराव महाजन यांच्यासह शहरातील तिनही आखाड्याचे स्थानिक साधू, महंत व पुरोहीत संघाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते़(प्रतिनिधी)
* शाही मिरवणूक मार्ग हा पुर्वीप्रमाणेच राहणार
* सात मार्गांचे नियोजन करण्यात येणाऱ
* भाविक व साधू यांच्या सुरक्षिततेचे नियोजन करून आखाडा व खालसा प्रमाणे ओळखपत्र देण्याचा विचार
* टाकळी व दसक या ठिकाणी घाट प्रस्तावित़
* रमनी कमेटी अहवालानुसार कायद्याच्या चौकटीत रहाून कुंभमेळ्याचे नियोजन केले जाणार

Web Title: Bathe the devotees until the royal procession is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.