बोगस अपंग शोधून काढणार बच्चू कडू : कृती समितीच्या पदाधिकाºयांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST2017-09-28T23:38:13+5:302017-09-29T00:09:29+5:30

नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आले असता पिंपळगाव बसवंत येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे राज्य कोषाध्यक्ष संजय पगार व समवेत शिक्षक परीषद व बोगस अपंग विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.

Batchu Kang to find out the bogus cadre: Discussion of Executive Committee members | बोगस अपंग शोधून काढणार बच्चू कडू : कृती समितीच्या पदाधिकाºयांची चर्चा

बोगस अपंग शोधून काढणार बच्चू कडू : कृती समितीच्या पदाधिकाºयांची चर्चा

वडनेरभैरव : नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आले असता पिंपळगाव बसवंत येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे राज्य कोषाध्यक्ष संजय पगार व समवेत शिक्षक परीषद व बोगस अपंग विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार बच्चु कडु यांनी बोगस अपंग शिक्षक लढ्याबद्दल संजय पगार यांचेशी चर्चा केली. जिल्हा परिषद मध्ये भेट घेऊन यापूर्वी व आताही बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून विविध प्रकारचे फायदे घेतलेल्या शिक्षकांबद्दल प्रशासनाने पडताळणी बाबत दिरंगाई केल्याबद्दल जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगीतले.याप्रसंगी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके (नाशिकचे बच्चू कडु), जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, प्रमोद कुदळे, पुरोहित सर तसेच शिक्षक परीषदेचे कार्यवाह रमेश गोहिल, वासुदेव बोरसे, रावसाहेब जाधव, अमित निकम, राजेंद्र खैरनार, शांताराम कापसे, किशोर चंदन, पुंडलिक शिंगाडे, भाऊसाहेब भदाणे, मिलिंद इंगळे,उत्कर्ष कोंडावार, किरण पाटील, शशिकांत पाटील, दादा इथापे, विकास पाटील, विजय ठाकरे, किरण जाधव, शशिकांत बोरसे, अरविंद माळी, शरद बर्मे, प्रविण देवरे, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Batchu Kang to find out the bogus cadre: Discussion of Executive Committee members