लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला अटक

By Admin | Updated: October 2, 2014 00:34 IST2014-10-02T00:29:10+5:302014-10-02T00:34:46+5:30

लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला अटक

Batch accepting policemen arrested | लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला अटक

लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला अटक


नाशिक : चांदवड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पडकले आहे.
चांदवड येथे मोटारसायकलचा अपघात झाला होता. त्यातील जखमीस चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदाराने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव रूपला यांनी वाहनांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली होती.
ती कागदपत्रे परत देण्यासाठी व मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करू नये यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी त्यांच्याकडे सात हजार रुपयाची मागणी
केली. चांदवड पोलीस ठाण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये खासगी व्यक्तीमार्फत संशयित बाळू चिंंतामण निरभवणे यांना सात हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पडकले.
(वार्ताहर)

Web Title: Batch accepting policemen arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.