तळघर कचऱ्यात, वाहने रस्त्यात !
By Admin | Updated: January 5, 2016 01:00 IST2016-01-05T00:47:14+5:302016-01-05T01:00:11+5:30
वापरच नाही : शेकडो इमारतींच्या गोलमालकडे पालिका प्रशासनाची डोळेझाक

तळघर कचऱ्यात, वाहने रस्त्यात !
नाशिक : तळघरात वाहनतळ दाखवून त्यावर इमारती उभ्या करण्यात आल्या. परंतु तळघरात व्यावसाय सुरू आहे किंवा कचरा टाकून बंदिस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे जी वाहने किमान दुचाकी तळघरात हव्यात त्या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शहरात वाहनतळ उभे करण्याची जबाबदारी ज्या पालिकेची आहे त्यांनीच या बेकायदा इमारतींचे नकाशे मंजूर केले आणि डोळे झाकून पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत. या गोलमाल किंवा गैरप्रकाराकडे पालिकेची डोळेझाक होत आहे. वाहनांसाठी असलेली ही बंदिस्त तळघरे खुली केली तर अनेक मार्गांवरील पार्किंगप्रश्न सुटू
शकतो. मात्र असे न करता सामान्य नागरिकांच्या वाहनांची उचलेगिरी करून आणि भुर्दंड देऊन प्रश्न कसा सुटणार, हा प्रश्न आहे.