जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी बर्डे
By Admin | Updated: July 29, 2016 00:22 IST2016-07-28T23:54:02+5:302016-07-29T00:22:33+5:30
जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी बर्डे

जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी बर्डे
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी संजय बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विष्णू तांबे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. नूतन उपसरपंच निवडीसाठी सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी संजय बर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य उषा विलास जेजूरकर, तर अनुमोदक म्हणून भाऊसाहेब भास्कर यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत उपसरपंचपदासाठी बर्डे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जेजूरकर, सुरेखा पिंपळे, उज्ज्वला जेजूरकर, ग्रामसेवक एम. जी. शेख उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर बर्डे यांचा सरपंच शशिकांत पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबजी पाटील, कारभारी जेजूरकर, अनिल गाडेकर, बाळू जेजूरकर, अंबादास जेजूरकर, शरद कमोद, दिनकर उघाडे, सौरभ जेजूरकर, धनलक्ष्मीचे संचालक सुदाम कमोद, किसन पवार, गोविंद जेजूरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
चिराई घाटात वृक्षारोपणाची मागणी
सुरगाणा : तालुक्यातील सुरगाणा-बोरगाव रस्त्यावरील चिराई घाटात वृक्षारोपण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. पावसाचे दिवस असल्याने या परिसरातील डोंगरमाथ्यावर व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.