बारागाव पिंप्रीत मास्क, सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:57+5:302021-06-03T04:10:57+5:30

---------------------- ठाणगाव विद्यालयास दोन लाखांची मदत सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील पुं. रा. भोर विद्यालयास वाचनालय इमारत बांधकामासाठी ठाणगावचे ...

Baragaon Pimpreet Mask, Sanitizer Distribution | बारागाव पिंप्रीत मास्क, सॅनिटायझर वाटप

बारागाव पिंप्रीत मास्क, सॅनिटायझर वाटप

----------------------

ठाणगाव विद्यालयास दोन लाखांची मदत

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथील पुं. रा. भोर विद्यालयास वाचनालय इमारत बांधकामासाठी ठाणगावचे भूमिपुत्र तथा मुंबईचे आयकर उपआयुक्त भरत आंधळे यांनी २ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली. त्यांच्या योगदानाबद्दल प्राचार्य व्ही. एस. कवडे, माजी सरपंच नामदेव शिंदे, अरुण केदार, दत्तात्रय आव्हाड यांच्यासह शालेय समितीच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.

-----------------------

अपघातग्रस्त वाहनांचा सुटे पार्टसह लिलाव

सिन्नर : वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेवारस व अपघातग्रस्त दुचाकी वाहनांचे सुटे पार्ट करून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वाहनांचे निर्धारित मुल्यांकनाप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी दिली. ज्यांना या लिलावात सहभागी व्हायचे असेल त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांची पाहणी करून आपले नाव पोलीस ठाण्यात नोंदविण्याचे आवाहन सहाय्यक निरीक्षक कोते यांनी केले आहे.

Web Title: Baragaon Pimpreet Mask, Sanitizer Distribution