बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रम
By Admin | Updated: November 27, 2014 23:47 IST2014-11-27T23:47:35+5:302014-11-27T23:47:47+5:30
चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू

बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रम
येवला : तालुक्यातील सायगाव येथे खंडेराव यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात मिरवणुकीदरम्यान चालत्या गाडीला हात लावण्याच्या प्रयत्नात चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
सायगाव येथे गेल्या ३५ वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. गुरुवारी हिरामण पठारे, गणपत कांडेकर, परेश निघुट, भाऊसाहेब भालेराव या चार मानकऱ्यांनी भक्तांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली. कैलास पुंजाजी पठारे (४६) यांनी गाडीला हात लावण्याचा प्रयत्न केला असता पहिल्या ६ गाड्या पुढे गेल्यानंतर अखेरच्या ६ गाड्याच्या चाकाखाली ते सापडले. त्यांच्या पोटावरून चाक गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पठारे यांच्या पश्चात आई, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)