निऱ्हाळे येथील बाप्पाची सर्वत्र चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:04+5:302021-09-13T04:13:04+5:30
झाडातच देव आहे ही संकल्पना मुलांमध्ये रुजवावी तसेच पर्यावरणाबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांच्या ...

निऱ्हाळे येथील बाप्पाची सर्वत्र चर्चा
झाडातच देव आहे ही संकल्पना मुलांमध्ये रुजवावी तसेच पर्यावरणाबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांच्या संकल्पनेतून वृक्षामध्ये श्री गणेशाची प्रतिकृती तयार केली जाते. यासाठी नेहमीच चित्रकला शिक्षक किशोर सरवार प्रयत्नशील असतात. त्यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या उत्साहात भाग घेऊन त्यांना सहकार्य करतात. वृक्षातील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निऱ्हाळे गावातील ग्रामस्थ येतात. रस्त्याने जाणारे नागरिकही थांबून या अनोख्या गजाननाचे दर्शन घेतात. पर्यावरण पूरक गणपती बसवावे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही. ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरी’ हा संदेश पुढील पिढीला देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे सरवार यांनी सांगितले.
फोटो - १२ ट्री गणेश
चित्रकला शिक्षक किशोर सरवार यांनी वृक्षात गणपती बाप्पा तयार केला यावेळी त्याचे दर्शन घेताना सरवार सर.