शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:25 IST

नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची ...

नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे एकूण ११० सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली.गणरायांच्या आगमनामुुुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून घराघरांत व सार्वजनिक मंडलाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. सोमवारी सकाळपासून गणपतीमूर्ती विक्रीच्या स्टालवर भाविक सहकुटुंब मूर्ती घेण्यासाठी आले होते.काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणरायाचा जयजयकार करत मिरवणूक काढून श्री गणरायाची स्थापना केली.जेलरोड येथे मनपाकडून मूर्तीविके्रत्यांना उभारून देण्यात आलेल्या स्टॉलवर मूर्ती, पूजेचे साहित्य, डेकोरेशन घेण्यास दिवसभर गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यामुळे वाहतूक हळूहळू सुरू होती. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री गणरायांच्या आगमनामुळे बच्चे कंपनीत मोठा आनंद दिसून येत होता.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, ईगल स्पोर्ट्स अ‍ॅण्ड सोशल क्लब, प्रेस वेल्फेअर सोसायटी, बालाजी सोशल फाउंडेशन, देवळालीगावातील संभाजीरोड मित्रमंडळ, अनुराधा फेण्ड सर्कल, म्हसोबा मित्रमंडळ, श्री गणेश एकता कला व क्र ीडामंडळ, देवळालीगाव कला, क्र ीडामंडळ आदी मंडळांनी मोठमोठे चलत देखावे साकारले आहेत. मंडळांनी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे तेथील परिसर उजळून गेला आहे.नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील वीस बंदीवानांनी तयार केलेल्या एक हजार श्री गणेशमूर्तींना यंदाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याने सर्वच मूर्तींची विक्री झाली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात वीस बंदीबांधवांनी पर्यावरणपूरक हजाराहून अधिक गणेशमूर्ती साकारल्या होत्या. यंदा कागदाच्या लगद्यापासून व शाडूमातीने बारा फुटांची मूर्ती बनविण्यात आली होती. लॅमरोड येथील संसरी नाका मित्रमंडळाने सदर मूर्ती घेऊन स्थापना केली.मूर्ती घेणाऱ्या भाविकांना पाट आणि वस्त्रदेखील देण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, कारखानाप्रमुख पल्लवी कदम यांनी सांगितले. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर मूर्ती विकण्याचे नवीन केंद्र उभारण्यात आले आहे. बंदीबांधवांनी बनविलेल्या जवळपास सर्वच मूर्ती विक्रीस गेल्या आहेत. सोमवारी सकाळपासून कारागृहाच्या केंद्रात मूर्ती घेण्यासाठी भाविक सहकुटुंब आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक