शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आगळे रुप : चार टन उसापासून नाशकात साकारले बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:26 IST

नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा वापर करत ‘श्रीं’चे रुप साकारले.

ठळक मुद्दे‘युनिक-इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाची परंपरा कायम दरवर्षी या मंडळाकडून नाविन्यपूर्ण कलाकृतींचा शोध

अझहर शेख, नाशिक : ढोल-ताशांचा घुमणारा आवाज...देखाव्यांच्या माध्यमातून जनप्रबोधनाची पर्वणी...गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. पंचवटीमधील पाथरवट लेन येथील लक्ष्मी छाया मित्र मंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘युनिक-इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सुमारे चार टन   ऊसाचा वापर करुन लाडक्या बाप्पांचे आकर्षक रुप साकारले आहे.नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा वापर करत ‘श्रीं’चे रुप साकारले.‘जरा हटके’ आगळीवेगळी संकल्पना व तीदेखील पर्यावरणपुरकच असेल याचा वर्षभर विचार करत त्या संकल्पनेतून भन्नाट शक्कल लढवित या मंडळाचे कार्यकर्ते गेल्या २००४ सालापासून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होत असतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला विविध संस्था, संघटनांकडून बक्षिसेही मिळाली आहेत. एकूणच गणेशोत्सवात शहरातील मुख्य आकर्षण पंचवटी भागातील या मंडळाचा गणपती असतो. मागील वर्षी या मंडळाने चक्क पाच हजार चिंचोक्यांपासून गणरायांची सुबकमुर्ती साकारली होती. पर्यावरणपुरक गणरायाचे रुप साकारल्यानंतर दरवर्षी त्याचे विसर्जन मंडळाकडून केले जात नाही तर ज्या गणेशभक्तांना ते रुपडे भावले त्यांना ते दिले जाते. मंडळाचे अनुप महाजन, रोशन झेंडे, अक्षय झेंडे, अभिजीत वाघ, हरी घोडके, अविनाश वानखेडकर आदि कार्यकर्ते असा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतात. एकापेक्षा एक सरस संकल्पनांच्या माध्यमातून दरवर्षी या मंडळाकडून नाविन्यपूर्ण कलाकृ तींचा शोध घेत लाडक्या बाप्पांचे आगळेवेगळे रुप नाशिककरांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Nashikनाशिक