दगडखाणीत आढळले बापलेकांचे मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:28+5:302021-09-09T04:20:28+5:30

ओझर येथील रहिवासी असलेल्या एका ३४ वर्षीय इसम आपल्या दोन चिमुकल्या मुलामुलींसह सोमवारपासून घरातून अचानकपणे बेपत्ता झाला होता. दोन ...

Bapleka's body found in a quarry | दगडखाणीत आढळले बापलेकांचे मृतदेह

दगडखाणीत आढळले बापलेकांचे मृतदेह

ओझर येथील रहिवासी असलेल्या एका ३४ वर्षीय इसम आपल्या दोन चिमुकल्या मुलामुलींसह सोमवारपासून घरातून अचानकपणे बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनंतर आडगावपासून पुढे असलेल्या सय्यदपिंप्री शिवारातील दगडाच्या एका खाणीतील डोहात दोन मुलांसह एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही लोकांना दिसला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने पोलिसांनी तीनही मृतदेह डोहातून बाहेर काढले. ओझर येथील त्याच्या नातेवाइकांना घटनास्थळी बोलावून मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले शंकर गुलाब महाजन (३४, रा. भगतसिंगनगर, ओझर) त्यांची तीनवर्षीय मुलगी प्रगती व मुलगा पृथ्वी यांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुका पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Bapleka's body found in a quarry