जैन स्थानकाचे भूमिपूजन
By Admin | Updated: October 13, 2016 00:43 IST2016-10-13T00:41:18+5:302016-10-13T00:43:28+5:30
लासलगाव : मधुस्मिताजी म. सा. यांचा वाढदिवस

जैन स्थानकाचे भूमिपूजन
लासलगाव : आपसातील विसंवाद मिटवून लासलगाव येथील जैन समाजाने आपल्या एकत्रित येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकोप्याने लासलगाव येथील जैन स्थानक निर्मितीसाठी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भूमिपूजन होत आहे यासारखा दुसरा आनंद नाही. याच एकोप्याने समाजोन्नती व्हावी, असे विचार प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्र मात बोलताना केले.
यानंतर संपन्न झालेल्या प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या वाढदिवसानिमित्त प.पू. भावप्रीतीजी म. सा., प.पू. विधीजी म. सा यांच्या उपस्थितीत शानदार धार्मिक कार्यक्र म संपन्न झाला. प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या आवाहनानुसार लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ गोशाळा बांधण्याकरिता जागा दिली जाईल, असे लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी सांगितले. माजी आमदार कल्याणराव पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील, उद्योगपती हिरालाल साबद्रा, सोहनलाल भंडारी, रतनलाल राका, ओमप्रकाश राका, जव्हेरीलाल ब्रह्मेचा, अशोक कटारिया, विजय कांतीलाल कोठारी, मोहनलाल चोपडा, अशोक पगारिया, अशोक जैन, मोहनलाल लोढा, राजेश जैन, अजय ब्रह्मेचा, आशिष नहार, राजू जैन, जे. सी. भंडारी, ललित मोदी, अॅड. नंदाबाई मुथा, नंदकुमार भटेवरा, मनसुख गुगळे, प्रकाश भंडारी, कांतीलाल रायसोनी, मनोज मुथा, लखन चंद्रशेखर पारख, राजेंद्र
सोनी, कांतीलाल सोनी यांनी
आपल्या भाषणात सामाजिक कार्याचा गौरव केला. याप्रसंगी प.पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गुरूंनी पाठवलेली शाल समारंभपूर्वक देण्यात आली. (वार्ताहर)