शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वर्षे जुने झाड : पिंपळपारावरील वटवृक्ष कोसळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:41 IST

लॉकडाउन सुरू असल्यामुळे वर्दळ फारशी नसल्याने जीवीतहानीचा धोका टळला. संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वटवृक्षाचा बुंधा जमिनीतूनच उन्मळल्याने हे झाड झपकन खाली कोसळले.

ठळक मुद्देलॉकडाउनमुळे अनर्थ टळलाचारचाकींचे नुकसान

नाशिक : जुन्या नाशकातील नेहरू चौकातील पिंपळपारासमोर असलेला सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे जुना वटववृक्ष बुधवारी (दि.१३) वादळी वाऱ्याने उन्मळून पडला. प्रचंड विस्तार अन् दाट पर्णसांभार असलेला हा वटवृक्ष अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.बुधवारी संध्याकाळी सुटलेल्या वादळी वा-याने हा वटवृक्ष धरातिर्थी पडल्याने झाडाच्या सावलीला उभ्या असेल्या चारचाकी मोटारींचे नुकसान झाले. लॉकडाउन सुरू असल्यामुळे वर्दळ फारशी नसल्याने जीवीतहानीचा धोका टळला. संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वटवृक्षाचा बुंधा जमिनीतूनच उन्मळल्याने हे झाड झपकन खाली कोसळले. यावेळी मोठा आवाजही परिसरात ऐकू आला. झाडाच्या सावलीला रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार मोटारी फांद्यांखाली दाबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच शिंगाडातलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून जवान बंबासह घटनास्थळी अवघ्या काही मिनिटांतच दाखल झाले. तत्काळ जवानांनी पेट्रोलकटरच्या सहाय्याने कोसळलेल्या वटवृक्षांच्या फांद्या कापून त्याखाली दाबल्या गेलेल्या मोटारी मोकळ्या केल्या. वटवृक्षाच्या दाट पर्णसांभारामुळे उन्हाळ्यातसुध्दा पांथस्थांना या चौकात अल्हाददायक वातावरण अनुभवयास येत होते. ऐन उन्हाळ्यात वटवृक्ष कोसळल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

वटवृक्ष सुमारे तीस ते चाळीस वर्षे जुना होता. तांदूळबाजार, दुधबाजार, गौरीबाजार या चौकात याच झाडाच्या सावलीला तेव्हा भरत असे. हा वटवृक्ष मी शाळकरी वयापासून बघत आलो आहे. या झाडाच्या सावलीखाली निवृत्तीदादा बर्वे, काकासाहेब सोलापूरकर, माजी नगरसेवक रघुवीर भालेराव यांचा व्यवसाय होता. या झाडाच्या सावलीखाली मीदेखील तांदूळविक्री केल्याचे आठवते.- शंकर बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघातenvironmentपर्यावरण