बँकांकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला

By Admin | Updated: April 5, 2017 00:19 IST2017-04-05T00:18:59+5:302017-04-05T00:19:15+5:30

कमीत कमी बॅलन्स : पूर्ण रक्कम काढता येत नसल्याने नाराजी

Bank scam student scholarship | बँकांकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला

बँकांकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृटत्ती योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून राष्ट्रीयीकृत बँका कमीत कमी बॅलन्सच्या नावाखाली दंड आकारून लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीलाभापासून वंचित ठेवत आहे. बँकांच्या या मनमानी कारभारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पालकाचे एक लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (प्रति विद्याथ्यासाठी) पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी १०००, इयत्ता पाचवी ते सातवी १५००, इयत्ता आठवी ते दहावी २००० रूपये याप्रमाणे शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. बहुतांश पालक अशिक्षित, मोलमजुरी करणारे असल्याने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे हे त्यांच्या दृष्टीने एक दिव्यच. शून्य रुपये बॅलन्सवर खाते उघडा असे शासनस्तरावरून स्पष्टपणे सांगितले जात असतानाही बँक कर्मचाऱ्यांकडून त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. पालक नाइलाजास्तव कमीत कमी रक्कम टाकून खाते उघडतात. आणि बँक अशाच पालक, विद्यार्थी अथवा दोघांचेही संयुक्त खात्यावरून दंड रूपाने परस्पर रक्कम कापून घेत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bank scam student scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.