बँक फसवणुकीतील संशयितास कोठडी

By Admin | Updated: June 9, 2016 00:15 IST2016-06-08T22:08:07+5:302016-06-09T00:15:54+5:30

८० लाखांची फसवणूक : औरंगाबाद येथील व्यवस्थापकावर कारवाई

Bank fraud suspects | बँक फसवणुकीतील संशयितास कोठडी

बँक फसवणुकीतील संशयितास कोठडी

 नाशिक : बँक आॅफ बडोदाच्या शहरातील विविध एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या एकूण रकमेपैकी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील अ‍ॅक्टिव सिक्युअर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अर्जुन उत्तमराव वऱ्हाडे (रा़ शहानूरवाडी) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे़ त्यास न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
पुणे येथील विक्र म भडलकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक शहरातील बँक आॅफ बडोदाच्या विविध ४३ शाखांमधील एटीममध्ये पैसे भरण्याचे काम अ‍ॅक्टिव्ह सिक्युअर कंपनीकडे आहे़ या कंपनीचे व्यवस्थापक अर्जुन वऱ्हाडे यांनी ५ जानेवारी ते २५ जानेवारी २०१६ या कालावधीत बँकेच्या गोल्फ क्लब शाखेतून एक कोटी ९० लाख रुपये एटीएममध्ये टाकण्यासाठी काढले़ मात्र, त्यापैकी ८० लाख रुपयांचा भरणा न करता ही रक्कम इंदिरानगरमधील स्वत:च्या कार्यालयातच ठेवून बँकेची फसवणूक केली़
या प्रकरणी भडलकर यांच्या फिर्यादीवरून वऱ्हाडेवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यास अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bank fraud suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.