बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची ३४ लाखांची फसवणूक
By Admin | Updated: April 3, 2017 13:38 IST2017-04-03T13:38:14+5:302017-04-03T13:38:14+5:30
सोसायटीतील दोन फ्लॅटच्या मुळ मालकांऐवजी डमी व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावे फ्लॅटचे बनावट करारनामे तयार केल्यानंतर त्यावर स्टेट बँक आॅफ फायनान्सकडून लाखो रुपये कर्ज घेऊन बँकेची ३४ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची ३४ लाखांची फसवणूक
नाशिक : डिसुझा कॉलनीतील एका सोसायटीतील दोन फ्लॅटच्या मुळ मालकांऐवजी डमी व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावे फ्लॅटचे बनावट करारनामे तयार केल्यानंतर त्यावर स्टेट बँक आॅफ फायनान्सकडून लाखो रुपये कर्ज घेऊन बँकेची ३४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सुमारे अडीच वर्षानंतर उघडकीस आला आहे़
प्रणव धनपाल कुऱ्हाडे (रा़धनश्री अपार्टमेंट, डिसुझा कॉलनी, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डिसूझा कॉलनी परिसरात लभाई अॅनेक्स नावाची इमारत आहे़ आॅगस्ट २०१४ मध्ये या इमारतीतील फ्लॅट नंबर २ व ६च्या खरेदी दरम्यान इमारतीचे मूळ बिल्डर समीर नहार, मंगला कोचर व राजेंद्र धारसकर यांच्याऐवजी संशयित प्रमोद युवराव सूर्यवंशी, प्रतिक्षा प्रमोद सूर्यवंशी (रा़उत्तमनगर,सिडको), शैलेंद्र धु्रव पाटील, ध्रुव गणपत पाटील (रा़रौनक आर्केड, रामेश्वर नगर, आनंदवली,नाशिक) यांना उभे करून खोटे बनावट करारनामे तयार केले़ हे करारनामे अस्सल असल्याचे भासविण्यासाठी त्यावरील स्टॅम्प ड्यूटी भरून ते करारनामे दुय्यम निबंधकांकडे नोंदविले़