बँक कर्मचाऱ्यांचा आज संप
By Admin | Updated: February 28, 2017 01:52 IST2017-02-28T01:51:58+5:302017-02-28T01:52:42+5:30
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२८) संप पुकारला आहे

बँक कर्मचाऱ्यांचा आज संप
नाशिक : बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२८) संप पुकारला आहे. या संपात जिल्हाभरातील विविध बँकांच्या साडेतीनशे शाखांमधील तीन हजार ५०० कर्मचारी सहभागी होणार असल्याने या सर्व शाखा मंगळवारी बंद राहण्याची शक्यता आहे.
देशातील नऊ बँक संघटना या संपात सहभागी होणार आहेत. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांशी कारकु नी कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने शहरातील बहुतेक बँका बंद राहणार आहेत.
नोटाबंदीनंतर बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे पंतप्रधान कौतुक करीत आहेत. मात्र दोन महिन्यांत त्याचा मोबदला मिळालेला नाही. याउलट बाजारात दोन हजार रु पयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र पाचशे व दोन हजार रु पयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशीन अद्याप एकाही बँक शाखेत पुरविलेल्या नसल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी कामासाठी कं त्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे थांबवून तत्काळ कायमस्वरूपी तत्त्वावर भरती करण्याची संघटनेतर्फे मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)