सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक शाखाधिकाऱ्यांची बैठक

By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-01T21:31:51+5:302014-09-02T01:13:22+5:30

सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक शाखाधिकाऱ्यांची बैठक

Bank branch officials meeting for safety | सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक शाखाधिकाऱ्यांची बैठक

सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक शाखाधिकाऱ्यांची बैठक

 

निफाड : शहरातील विविध बँकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निफाडमधील विविध बँकांच्या शाखाधिकाऱ्यांची बैठक निफाड पोलीस ठाण्यात झाली.
बैठकीस पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी मार्गदर्शन केले. एटीएम सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक नेमावा, एटीएमला संकटकाळात मदत करेल अशी सिस्टीम बसवावी, प्रत्येक बँकेने बँकेच्या बाहेरही सिसीटीव्ही कॅमेरे बसवावे, आदिंसह इतर सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या. बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही बसवल्याचे उपस्थित शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी सांगितले की, बँकेतून रक्कम काढल्यानंतर दुचाकीवर सदर रक्कम नेणाऱ्या ग्राहकांना लुटणाऱ्या चोरट्यांचा व सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आठ पोलीस कर्मचाऱ्यांची नेणमूक करण्यात आलेली आहे.
निफाडच्या प्रमुख रस्त्यावर दिवसा दोन पोलीस पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेले आहे. बँकेतून रक्कम काढल्यानंतर पैशाची बॅग व पिशवी मोटारसायकलच्या हॅण्डलला न अडकवता ती डिकीमध्ये सुरक्षितपणे ठेवून मोटारसायकलवर घरी जावे, असे निघोट यांनी सांगितले. निफाडच्या सर्व बँकांमध्ये ग्राहकांनी पैशाच्या सुरक्षततेसंबंधी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात पत्रके चिकटवण्यात आलेली आहेत. शिवाय एटीएम संदर्भात दागिने लुटमार संदर्भात रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध नागरिक, महिलांना वेगवेगळी खोटी कारणे सांगून लुटणाऱ्यासंदर्भात कोणकोणती काळजी घ्यावी याच्या एकवीस सूचनांचे माहितीपत्रकच घरोघरी, शाळाशाळामधून निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने वाटण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Bank branch officials meeting for safety