बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 21:01 IST2017-08-10T21:00:39+5:302017-08-10T21:01:20+5:30
बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवून घेऊन बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील राजेश रमेश गुप्ता या संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा
नाशिक : बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवून घेऊन बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील राजेश रमेश गुप्ता या संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबईतील कांदीवली येथील रहिवासी धर्मेश लक्ष्मीदास आशर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित राजेश गुप्ता याने १५ लाख रुपयांचा बनावट धनादेश तयार केला़ हा धनादेश २८ व २९ जुलै २०१५ या कालावधीत नवी मुंबईतील नेरूळच्या बँक आॅफ बडोदामध्ये वटविण्यासाठी टाकला़ त्यासाठी संशयिताने स्वत:ची राजेश स्टील नावाची कंपनी असल्याचे सांगितले़
संशयित राजेश गुप्ता याने बडोदा बँकेत बनावट धनादेश वटवून मिळालेल्या पंधरा लाखांपैकी १३ लाख ५० हजार रुपये पुन्हा बँकेत जमा केले व उर्वरित दीड लाख रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़