कर वसुलीसाठी बँडबाजा
By Admin | Updated: March 30, 2017 01:06 IST2017-03-30T01:06:27+5:302017-03-30T01:06:40+5:30
पेठ : मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पेठ नगरपंचायतीने धडक वसुली मोहीम सुरू केली असून, थकबाकीदारांच्या दारासमोर बँडबाजा वाजवून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.

कर वसुलीसाठी बँडबाजा
पेठ : मार्चअखेर कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पेठ नगरपंचायतीने धडक वसुली मोहीम सुरू केली असून, थकबाकीदारांच्या दारासमोर बँडबाजा वाजवून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. पेठ शहरात घरगुती वापरासह व्यावसायिक दुकाने व गाळे असून, नगरपंचायत अंतर्गत कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतच्या वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून ढोलताशा वाजवून वसुली करण्यात आली. (वार्ताहर)