शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भगूर, देवळाली कॅम्पचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:07 IST

जून महिना सुरू होऊनही यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून, त्यामुळे दारणा नदीपात्राची पाणी पातळी संपली आहे. देवळाली छावनी परिषदेच्या नागरी आणि लष्करी भागाला दारणा नदीपात्रालगतच्या पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो.

ठळक मुद्देगंभीर संकट : दारणातून आवर्तन सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभगूर : भगूर व देवळाली कॅम्प शहराला पाणीपुरवठा करणारी दारणा नदी आटल्याने भगूर आणि देवळाली कॅम्प शहराचा पाणीपुरवठा बंद झाला असून, दारणा धरणातून आवर्तन लवकर न सोडल्यास पाणी समस्या गंभीर होऊन आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन भगूर मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगराध्यक्ष अनिता करंजकर यांनी केले आहे.

जून महिना सुरू होऊनही यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून, त्यामुळे दारणा नदीपात्राची पाणी पातळी संपली आहे. देवळाली छावनी परिषदेच्या नागरी आणि लष्करी भागाला दारणा नदीपात्रालगतच्या पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कार्यान्वित असलेल्या इंटेक वेलचे एक स्टेनर पाणी पातळी घटल्याने उघडे पडले आहे. दुसऱ्या स्टेनरमधून पाणी साठा उपलब्ध नाही. जर दुसºया स्टेनरला पुरेसा पाणी साठा नसल्यास पात्रात चर खोदून पाण्याचा प्रवाह स्टेनरपर्यंत नेण्याची कसरत करावी लागू शकते. दारणा पात्रातील पाणी साठा संपुष्टात आल्याने देवळाली कॅम्पला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तशीच परिस्थिती भगूरकरांची झाली आहे. दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास अथवा दारणा धरणातून आवर्तन दिल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल. अन्यथा पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. भगूर व छावणी परिषद प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तरीही जनतेने पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा. पाणी वाया घालवू नये. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, तसे करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास भगूरकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन भगूर नगरपालिकेतर्फे केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक