वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून
By Admin | Updated: October 3, 2014 23:17 IST2014-10-03T23:17:40+5:302014-10-03T23:17:59+5:30
वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून

वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून
कळवण : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हे सूत्र लक्षात घेऊन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या श्रमदान वनराई बंधारा उपक्रमाला कळवण तालुक्यातील आठंबे शिवारापासून सुरुवात करण्यात आली.डवले यांनी सुचविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने गाव परिसरात किमान दहा वनराई बंधाऱ्यांची बांधणी श्रमदानातून करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बचतगट, स्वयंसेवी संस्था अशा विविध सामाजिक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.